आली ही थंडी गुलाबी


आली ही थंडी गुलाबी


आज अचानक सकाळी मला लवकर जाग आली. जशी कधी तरी येते तशी. ऐरवी मी तीन-चार तास उशीरा उठतो. अलार्म वैगरे लावून मला झोपण्याची सवय नाही; त्यामुळे उठण्याचीही नाही. पूर्ण झोप काढून उठायचं. कुंभकर्णाने केली ती चूक आपण करायची नाही. अर्ध्या झोपेतून गेलेला म्हणून मारला गेला. पण त्याचं मरू दे! आज सकाळी मी लवकर उठलो. बायको रोजच्यासारखीच घट्ट बिलगून झोपलेली. पण इतर कुठच्या गोष्टीचा मूड झाला नाही म्हणून घराबाहेर पडलो. हिंडायला. अजून सगळीकडे अंधारच होता. कदाचित सूर्य त्याच्या बेडरूममध्ये असावा. चांदण्या आकाशात छान लुकलुकत होत्या. बहुतेक त्यांना सूर्याची गंमत माहित असावी किंवा ‘सूर्याला आज उशीरचं होणार’ हे त्यांच्या ध्यानी आलेलं असावं. पण खरोखर उशीर झाला असेल तर सूर्याने त्याचं टेन्शन घेवू नये. चांगले थंडीचे दिवस आहेत, साला आता मजा नाय करायची तर केव्हा करायची? चांदण्या म्हणतील पावसाळ्यात पण मजा करतोच की! तरी त्याला हक्क आहे. त्याची बायको मार्च मध्ये माहेरी जाते ती डायरेक्ट जूनमध्ये येते. इतके दिवस हा जी कळ काढतो ती काय थोडी? एकतर याच्या अंगात केवढी आग!
असो! बाहेर पडल्यापासून अंगाला चांगला गारवा जाणवतोय. ही थंडी गुलाबी का निळी,पिवळी,हिरवी, राखाडी मला माहित नाही. परंतु अगदीच कमी नाही आणि अगदीच जास्त नाही. छान वाटतंय. पण हे मुंबईत आलेले भैय्ये मूर्ख रस्त्यांवर कोपऱ्या-कोपऱ्यात शेकोट्या पेटवून बसलेत. शेकोट्यांवर शेकून दिल्लीच्या थंडीचा फील घेतायत. वाय.झेड साले. यांच्या बायका पण तिकडे शेकोट्याचं पेटवून बसल्या असतील. तरी लोकसंख्या यांचीच वाढतेय, आश्चर्य आहे? यांच्यापेक्षा ते उडिपी लोक बरे. हिवाळा असो वा उन्हाळा, पावसाळा नुसती इडलीचं बनवायची आणि वडेचं थापायचे. पाणी घालून चटणी वाढवायची आणि भोपळे टाकून सांबार. मुंबई साली या लोकांमुळे शांत नाही.
त्यात जॉगिंग करणाऱ्यांची एक जमात. या लोकांच्या आयुष्यात नेमकं काय बिघडलेलं असतं मला कळत नाही. नेहमी लवकर उठतात आणि घराबाहेर धावत सुटतात. अरे एक दिवस बारा वाजेपर्यंत अंथरुणात पडून रहा की! साल्यानों बघा काय मजा असते ती! रोज पहाटे उठलंच पाहिजे असा काय नियम नाही. हे लोक म्हणतात पहाट खूप सुंदर असते. पहाट निश्चितच सुंदर असते, पण तिला सुंदर म्हणण्याचा सुद्धा खरा अधिकार आमचा. कारण रोज लांबून डोळा मारणाऱ्यांना बेधडक कधी घरात शिरता येत नाही. ते फक्त लांबूनच डोळा मारत राह्तात. त्यातलाच हा प्रकार. आणि खरोखर ही जॉगिंग करणारी मंडळी खरंच विचित्र असतात. थोडी-थोडकी नाय तर खरोखर जाम विचित्र असतात. हे लोक डोक्यात कानटोपी घालतात, अंगात शर्ट, टी-शर्ट, वर स्वेटर, पायात बूट. आणि मधे अर्धी चड्डी. म्हणजे जास्त थंडी फक्त वर लागते.
काही जण संगीत ऐकत धावत असतात. हा प्रकार तर मला समजण्या पलिकडचा आहे. ही मंडळी नेमका कशाचा आनंद घेत असतात? धावण्याचा की संगीताचा. आणि हे नेमक कुठचं संगीत ऐकतात ज्यामुळे यांना धावत सुटावसं वाटत. तसंही आजकालचं बरंचस संगीत असचं आहे की कानावर हात धरावेत आणि पळत सुटावं. पण हे जॉगिंग वाले सरळसोट पण पळत नाहीत. ते प्रदक्षिणा घालतात. मैदानाला किंवा एखाद्या एरियाला. मी लग्नात सात प्रदक्षिणा घेतल्यापासूनचं खुश आहे. तेव्हाच म्हटलं, यापुढे जन्मभर कशाचीही प्रदक्षिणा काढायची नाही.
मग हे लोक एका कोपऱ्यात छोट्या बाकड्यावर स्टीलच्या बरण्या लावून बसलेल्या ज्यूसवालीकडे जातात. तिच्याकडे दूधी,गाजर,बीट,कारलं,कडूनिंब असे कसले-कसले रस असतात. ती कपभरून देते. हे ढोसतात. चेहऱ्याचे हावभाव बदलून दाखवतात की ज्यूस किती बेचव आहे. पण उत्तम तब्येतीसाठी हे प्यायलं पाहिजे असा सगळ्यांना फील द्यायचा असतो त्यांना. ही उत्तम तब्येतीसाठी झगडणारी माणसं मला कधी कोणत्या मोर्चात दिसत नाही किंवा कुठच्या आंदोलनात. मग ही माणस उत्तम तब्येतीच करतात काय? शिवाय नेहमी व्यायाम करून देखील जाडचं दिसतात. शिवाय बोलता-बोलता यांच्या तोंडून नेहमी निघतचं, “शुगर वाढलेय.”, “ रक्तचाप वाढतो.”, “हिमोग्लोबिन कमी आहे.”, अजून फलाना-फलाना. पण तरी या माणसांना जॉगिंग करताना इतर कोण निवांत बसलेला दिसला की हे असे अस्वस्थ होतात. त्यांना काय वाटत असतं, काय माहित नाही. पण नजर त्या माणसावर अशी असते की तो निवांत बसलेला माणूस यांच्या बापाचचं खाऊन आराम करतोय की काय?
फक्त या लोकांना ती ज्यूस वाली बाई गंडवते. वर्षाचे बारमाही स्वेटर घालून राहते. थंडी सरली असं गिऱ्हाईकाला अजिबात वाटायला नको. म्हणूनच ती वर्षावर्षाला जाड झालेली दिसते; अंगाने आणि पैश्याने. परत ती एकटीच नाही तर खाद्यपदार्थवाले सुद्धा. कारण जॉगिंग करणाऱ्या लोकांना घरी नाश्ता मिळतच नाही.
नंतर पहाट फटफटली की शाळेला जाणारी मुलं घरातून बाहेर पडलेली दिसतात. ही पहाट फटफटते म्हणजे नक्की काय होतं मला माहीत नाही. पण शब्द प्रयोग चांगला आहे. नित्य क्रम म्हणून शून्य भावाने निघालेली बिचारी मुलं शाळेकडे जात असतात. एखादा आनंदात जाताना दिसला तर समजून जायचं याला जास्तच अभ्यासाची खाज आहे किंवा हा जाऊन मित्राची कळ करणार आहे. परंतु या शाळेच्या मुलांना शाळेत पोहचविण्यासाठी मात्र वाहनचालकांची घाई झालेली असते. ते इतके झपाटून गाडी चालवत असतात की पन्हाळ गडावरून निघालेले शिवाजी विशालगडावर पोह्चण जितंक बाजीप्रभूला महत्वाचं वाटत होत तितकच याचं शाळेत पोहचण यांना महत्वाचं झालेलं असतं.
या सगळ्यात मात्र मुंबईच्या इमारती शांत असतात. एखाद्या गॅलरीत क़्वचित कोणीतरी दात घासताना किंवा एखादी बाई केस झटकताना दिसते. पूर्वी लोक गॅलरीत उभं राहून छोटासा आरसा पाहून दाढी करायचे. हल्ली कोणी तसं दिसत नाही. आमच्या इमारतीत राहणारे सुधाकर नाना तर रोजचं. नानी मागून चहा घेवून यायची. तिच्या हातून चहाचा कप घेताना नाना हळूचं पदराखालच्या उघड्या पोटावर नाजूक बोट फिरवायचे. नानी कमालीची लाजायची आणि कमालीची खुश व्हायची. अगदी साठी गेली तरी हा प्रकार चालूच होता. गाल गुळगुळीत असताना देखील नाना गालाला साबण फासायचे आणि फावड्यात ब्लेडचं पात न लावता गाल खरवडायचे. या गोष्टीतील रंगत काही औरच आहे. ती सकाळी उठून जॉगिंग करणाऱ्यांना तर जन्मात कळायची नाही.

माझी बायको पण मला फार सतावते. म्हणते, आपण दोघं दिवसेंदिवस जाड होत चाललोय. आपल्याला जॉगिंगला जायला हवं. मी रोज ‘हो’ म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अंथरुणातच पडलेलो असतो. एकतर ती माझ्या कुशीत तोंड खुपसून किंवा मी तिच्या स्तनात तोंड खुपसून. 
    

Comments

  1. Prabhav changla zalela distoy...

    ReplyDelete
  2. मग काय? त्याशिवाय वाचनाचा फायदा काय! तूला हवं ते पुस्तक

    ReplyDelete
    Replies
    1. हो...आणि 'कोसला' पण.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ

मनोगाथा