Posts

Showing posts from September, 2017

कल्लोळ

Image
 ( रात्रीची वेळ. एक तरुण मुलगा बाहेरून घरात येतो. हातातील ओली छत्री न उघडता तशीच फेकून देतो आणि एका खुर्चीत रेलून बसतो. [तो थोडा भिजलेला आहे.] मग ओघळणारे थेंब हातानेच पुसतो आणि झटक्यात उठून काहीतरी शोधू लागतो. एक डायरी त्याच्या हाताला लागते, तिची पानं चाळतो आणि कुठून तरी पेन हुडकून लिहू लागतो. ) यंदाच्या वर्षातही ग्रेड घसरणार. गेल्या वर्षी निदान B तरी मिळाला होता. टी.वाय. तर बाहेरून दिलेलंच बरं. साला हे आयुष्यात मित्र घुसलेत की दुश्मन. नासाडी होतेय सगळी. आजचीच गोष्ट घ्या. बाहेर छान पाऊस पडत होता. अभ्यासात मन लागतच नाही हल्ली, म्हणून म्हटलं ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय वाचून त्यावर चिंतन-मनन करू. तेवढच मौलिक काहीतरी. तितक्यात आला धन्या. चल बाहेर जाऊया. मी नाय येणार. पोरीसारखी नाटकं करू नको. नाटकं कसली? मला खरोखर नाय यायचं तुझ्याबरोबर. पिंकू असती नं तुला मस्का लावला नसता. भेंंच्योत बाप तिचा जबरदस्ती घेऊन गेला गावी. मरू दे, जावू दे. तू चल. पण कुठे जायचंय? पंचायती सोड आणि चल. बाहेर इतका मस्त पाऊस पडतोय अन् पोथ्या कसल्या वाचत बसलाय. शेवट ज्ञानेश्वरी राहिली. या चांडाळा

बाबांसोबत पाहिलेले गणपती

Image
बाबांसोबत पाहिलेले गणपती              मागले दोन दिवस पिच्छा पुरवल्या नंतर आज कार्ट्याने टोकाचाचं हट्ट धरला. “बाबा मला गणपती बघायला घेऊन चल.” आता काय सांगू याला...? रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन इतकं थकून जात की कशाचाचं उत्साह राहत नाही. तसंही घराबाहेर पडून आवडीने साजरे करावेत असे सण राहिले नाहीत, का उत्सव राहिले नाहीत.              पण बालपण म्हटलं की कुतूहल आलंच. लहानपणी मी सुद्धा माझ्या बाबांजवळ हट्ट धरला आणि अनेक गणपती पाहिले. त्यावेळचे गणेशोत्सव म्हणजे आनंद जल्लोष आजच्या इतकाचं, पण करमणूक आणि प्रबोधन त्याहून कित्येक पटीने जास्त. प्रत्येक छोट्या असो वा मोठ्या मंडपाबाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्या रांगेत लहानांपासून थोरांपर्यंत आणि श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्वच. निरनिराळी लोकं. धर्म,जात,पंथ विसरून आलेली. मग त्या रांगेत ओळख-पाळख, संवाद होऊन छान ऋणानुबंध जुळायचे. आम्हा लहान मुलांची तर फारचं गट्टी जमायची. मग आम्ही त्या रांगेचे उंदीर. कुठूनही घुसायचं कुठेही शिरायचं. अख्ख्या रांगेला आमचा परिचय पडायचा. मंडपातून बाहेर निघणाऱ्या दारावर प्रसाद वाटणारा बसविला असल्यास त