Posts

कलाश्रेय

Image
घरी सहज वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. शेजारची मुलं चित्रकलेच्या वह्या घेऊन आपआपली चित्रे मला दाखवण्याकरिता आली. प्रत्येकाने आप-आपल्या परीने  बऱ्यापैकी चित्रे काढली होती. मला देखील चित्रकलेची अत्यंत आवड असल्यामुळे त्यातल्या काही मुलांच्या वहीवर मी दोन-चार चित्रे रेखाटली. ती त्यांना खूप आवडली. त्यांपैकी एकाने मला विचारले, ‘’दादा तुझ्यासारखी चित्र आम्हाला कधी जमतील?" त्यांना मी सांगितलं, "आपल्या हातांना एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा सहवास जास्त लाभला की उत्तम कला जन्म घेते. जसे, हातात पेन्सिल धरल्यास चित्रकला, पेन धरल्यास शिल्पकला, पेटी, तबला, बासरी धरल्यास वाद्यकला अशा अनेक." त्यानंतर त्यांनी मी काढलेली आणखी चित्रे पाहण्यास मागितली व ती पहिल्यानंतर मला म्हणाले, "दादा तुझी चित्रे खूप छान आहेत!’’ मी म्हटलं, ‘’धन्यवाद; पण ही चित्रे मी काढली असली तरी माझी नाहीत. कारण माझ्या हातात कोणी तरी आधी पेन्सिल दिली, पेन्सिल धरलेल्या हाताला स्वतःच्या हातात धरून गिरवून घेतलं, कुणीतरी  रेघा, वर्तुळ, आकार आणि वळणं शिकवली, कुणीतरी ब्रश देऊन रंग भरायला शिकवले, चित्र सजवायला शिकवली, चि…

गार्गी

Image
मला माझे डोळे फोडून घ्यावेसे वाटतात; आज तुझ्या डोळ्यांत पाहताना. किती किळसवाणा दिसतो मी त्यात? नालायक, बेजबाबदार, अकर्तबगार, अयशस्वी आणि संपूर्णतः पराजित. गबाळा अवतार केला मी स्वतःचा आणि तूझासुद्धा. म्हणूनच तुझ्या डोळ्यांतील माया, प्रेम जसेच्या तसे असले तरी विश्वास आटला. अश्रूंनी तो आटवला. त्यात किंचितशी देखील उमेद राहिली नाही. पण प्रश्न हा आहे, तूला मी इतका अनोळखी झालोच कसा? माझी स्वप्न अशी मातीमोल का वाटू लागली तूला? माझा प्रामाणिकपणा निरर्थक कसा काय झाला? माझी मेहनत जी तुझ्या दृष्टीसमोर होती ती दृष्टीआड कशी गेली? माझा संघर्ष आज वेडेपणाचा का वाटतो तूला?     तू म्हणायचीस “तू बाळ आहेस माझं.” छातीशी धरून कित्येकदा पाजलससुद्धा. मी पण माझे हात इवलेसे करून तुझ्या छातीवरून फिरवायचो, तुझ्या पोटाला मिठी घालून शांत झोपून जायचो, तूलासुद्धा निवांत झोप यायची. माझे ओठ तूला तान्ह्या बाळाचे वाटायचे. ज्याला दुधाचा गंध नसला तरी तूला आवडणारा सिगरेटचा दर्प असायचा. त्या ओठांचे तू किती मुके घेतले तूला आठवतंय..! माझ्या अंगाचा घाम अभिमान होता तूझा. तू म्हणायचीस, "या घामाचं मोल परमेश्वराला कळल की लोकांन…

मनोगाथा

Image
मनोगाथा गिरणीत घालायला सांगितलेलं दळण तीन दिवस जागच्या जागी पडून होतं. आईने चिक्कार बोलणी ऐकवली. दळणाची पिशवी उचलली आणि चालू लागलो. आईचे शब्द कानात जसेच्या तसे घुमत होते. “कशात म्हणजे कशात काडीचं लक्ष नाही. देव जाणे कुठच्या धुंदीत असतात? यांच्यापेक्षा बेवडे तरी बरे...! पुढे जाऊन काय होणार आहे या कार्ट्याच काय माहित..?” आईचं सगळं बोलणं अगदी बरोबर होतं. सध्या चित्त स्थिर नाही. मनात वेगवेगळे निव्वळ तरंग नाही, तर  विचारांच्या विशाल लाटा उठतात. प्रश्नांचे तर इतके मोठे मनोरे उभे राहतात की त्यासमोर मी पुरता ढळून जातो. एक भयंकर पोकळी तयार झालेय आतमध्ये. जी कोणत्याही सुखाच्या क्षणाने भरली जात नाहीए. उलट दिवसेंदिवस मळभ पसरत चाललेय. उदासीनता गडद होत चाललेय. इतकी घनघोर की काही केल्या मन उभारी घेतचं नाही. मी थोरामोठ्यांची चरित्रे वाचतोय, तत्त्वज्ञान समजून घेतोय, इतिहासाची पानं मोडतोय, विज्ञान- तंत्रज्ञान अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतोय. ध्याची परिस्थिती मला सर्वकाल, सर्वयुंगापेक्षा महाभयंकर वाटतेय. सगळं वाटोळं होतंय. आणि ज्या गतिने होतंय ती गती अनाकलनीय आहे. जगाला मिनिटा-मिनिटात स्थित्यंतरे येत आह…

आली ही थंडी गुलाबी

Image
आली ही थंडी गुलाबी
आज अचानक सकाळी मला लवकर जाग आली. जशी कधी तरी येते तशी. ऐरवी मी तीन-चार तास उशीरा उठतो. अलार्म वैगरे लावून मला झोपण्याची सवय नाही; त्यामुळे उठण्याचीही नाही. पूर्ण झोप काढून उठायचं. कुंभकर्णाने केली ती चूक आपण करायची नाही. अर्ध्या झोपेतून गेलेला म्हणून मारला गेला. पण त्याचं मरू दे! आज सकाळी मी लवकर उठलो. बायको रोजच्यासारखीच घट्ट बिलगून झोपलेली. पण इतर कुठच्या गोष्टीचा मूड झाला नाही म्हणून घराबाहेर पडलो. हिंडायला. अजून सगळीकडे अंधारच होता. कदाचित सूर्य त्याच्या बेडरूममध्ये असावा. चांदण्या आकाशात छान लुकलुकत होत्या. बहुतेक त्यांना सूर्याची गंमत माहित असावी किंवा ‘सूर्याला आज उशीरचं होणार’ हे त्यांच्या ध्यानी आलेलं असावं. पण खरोखर उशीर झाला असेल तर सूर्याने त्याचं टेन्शन घेवू नये. चांगले थंडीचे दिवस आहेत, साला आता मजा नाय करायची तर केव्हा करायची? चांदण्या म्हणतील पावसाळ्यात पण मजा करतोच की! तरी त्याला हक्क आहे. त्याची बायको मार्च मध्ये माहेरी जाते ती डायरेक्ट जूनमध्ये येते. इतके दिवस हा जी कळ काढतो ती काय थोडी? एकतर याच्या अंगात केवढी आग! असो! बाहेर पडल्यापासून अंगाला चांग…

आनंदमेळा

Image
आमचं घर कधीच रिकामं राहत नाही. अगदी पहाटेपासून-रात्रीपर्यंत उंबऱ्याला पाय घासतच असतात लोकांचे. बागडणारी चिल्लर पार्टीसुद्धा आमच्या इथेच ठाण मांडून खेळते. घरात रोज मेळा भरलेला असतो; पण ‘आनंदमेळा.’ अगदी तशीच स्थिती आमच्या इमारती समोरल्या वटवृक्षाची. इतकी घरं सोडून आमच्याच घरी का माणसांची गर्दी होते, हे जसं मला कोडं? तसंच इतकी झाडं सोडून या झाडावरचं पक्षी-पाखरांची गर्दी कशी काय होते, हेही मला कोडं? आई मात्र कधी-कधी या सतत भरलेल्या घराला फार कंटाळते आणि आपला वैताग व्यक्त करू लागते. त्यावेळी मी दारासामोरला वटवृक्ष दाखवतो आणि म्हणतो, या झाडाला पक्ष्यांची श्रीमंती आहे आणि या घराला माणसांची. आई म्हणते, “या श्रीमंतीचा काय उपयोग? हाल आम्ही काढतोय!’’ आणि हसून पुन्हा नव्या उत्साहाने सगळ्यांच्या सेवेस तत्पर होते. आठ दिवसांपूर्वी तो वटवृक्ष मुळासकट छाटण्यात आला. कारण काय? तर पार्किंगची जागा वाढावी. त्याक्षणी पक्ष्यांनी जमेल तितकं थैमान माजवलं. आर्त स्वराचा, दुःखाचा कल्लोळ केला; पण त्यांचा पराभव झाला.‘ते बिथरलेले पक्षी आणि आडवं पडलेलं झाड’ चित्र खूप विदारक होतं. मनाला विषण्ण करणार होतं. एक-दोन दिवस आम…

दोन अक्षर दोन धडे

Image
ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा मी अगदीच लहान होते. जेमतेम सात-आठ वर्षाची असेन. तोवर नऊ वारी नेसायची वेळ आली नव्हती, परकर पोलक्यातचं असायचे. आमचं घर कोकणातलं. गुहागर तालुक्यात, निवळी गावात. छान आंबा, काजू, फणसाच्या गर्दीत मधोमध आमचं घर. मागच्या पडवीसमोर चार चिंचेची झाडं आणि एक माड. त्या माडाखाली उभं राहिलं की नाकासमोर निघणारी वाट थेट जंगलाकडे जाणारी. पुढे ही जंगलवाट आचऱ्यात आणि तळोठ्याला निघते.
मावशी त्या वाटेने अधीमधी आईला भेटायला यायची. कधी पहाटे-पहाटे कधी दुपारच्या वेळेस पण नेहमी गुपचूप. मागच्या दाराने यायची अन मागच्या दारानेच जायची. दोघींचा एकमेकीवर प्रचंड जिव्हाळा. मावशी आईपेक्षा दहा वर्षाने मोठी, कारण भावंडामध्ये आई सगळ्यात धाकटी. जन्मानंतरची दोन वर्ष आईने आजीच्या नाहीतर मावशीच्या कुशीत काढलेली. मग वयाच्या बाराव्या वर्षी मावशीच लग्न झालं आणि ती नवऱ्या घरी गेली. तेरा-चौदा वर्ष मावशीचा संसार अगदी सुखाचा झाला. पदरात तीन पिले रांगायला लागली आणि भावकीच्या जमीन-जुमल्याचा वादातून मारेकऱ्यांकरवी तिच्या नवऱ्याचा कोणीतरी काटा काढला. मावशी निराधार झाली. कर्मठ रूढीप्रमाणे विधवेचं जिनं तिच्या …

कल्लोळ

Image
( रात्रीची वेळ. एक तरुण मुलगा बाहेरून घरात येतो. हातातील ओली छत्री न उघडता तशीच फेकून देतो आणि एका खुर्चीत रेलून बसतो. [तो थोडा भिजलेला आहे.] मग ओघळणारे थेंब हातानेच पुसतो आणि झटक्यात उठून काहीतरी शोधू लागतो. एक डायरी त्याच्या हाताला लागते, तिची पानं चाळतो आणि कुठून तरी पेन हुडकून लिहू लागतो. ) यंदाच्या वर्षातही ग्रेड घसरणार. गेल्या वर्षी निदान B तरी मिळाला होता. टी.वाय. तर बाहेरून दिलेलंच बरं. साला हे आयुष्यात मित्र घुसलेत की दुश्मन. नासाडी होतेय सगळी. आजचीच गोष्ट घ्या. बाहेर छान पाऊस पडत होता. अभ्यासात मन लागतच नाही हल्ली, म्हणून म्हटलं ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय वाचून त्यावर चिंतन-मनन करू. तेवढच मौलिक काहीतरी. तितक्यात आला धन्या. चल बाहेर जाऊया. मी नाय येणार. पोरीसारखी नाटकं करू नको. नाटकं कसली? मला खरोखर नाय यायचं तुझ्याबरोबर. पिंकू असती नं तुला मस्का लावला नसता. भेंंच्योत बाप तिचा जबरदस्ती घेऊन गेला गावी. मरू दे, जावू दे. तू चल. पण कुठे जायचंय? पंचायती सोड आणि चल. बाहेर इतका मस्त पाऊस पडतोय अन् पोथ्या कसल्या वाचत बसलाय. शेवट ज्ञानेश्वरी राहिली. या चांडाळा बरोबर मी भटकंतीवर. पाऊस छान पड…