Posts

Showing posts from November, 2017

मनोगाथा

Image
मनोगाथा गिरणीत घालायला सांगितलेलं दळण तीन दिवस जागच्या जागी पडून होतं. आईने चिक्कार बोलणी ऐकवली. दळणाची पिशवी उचलली आणि चालू लागलो. आईचे शब्द कानात जसेच्या तसे घुमत होते. “कशात म्हणजे कशात काडीचं लक्ष नाही. देव जाणे कुठच्या धुंदीत असतात? यांच्यापेक्षा बेवडे तरी बरे...! पुढे जाऊन काय होणार आहे या कार्ट्याच काय माहित..?” आईचं सगळं बोलणं अगदी बरोबर होतं. सध्या चित्त स्थिर नाही. मनात वेगवेगळे निव्वळ तरंग नाही, तर  विचारांच्या विशाल लाटा उठतात. प्रश्नांचे तर इतके मोठे मनोरे उभे राहतात की त्यासमोर मी पुरता ढळून जातो. एक भयंकर पोकळी तयार झालेय आतमध्ये. जी कोणत्याही सुखाच्या क्षणाने भरली जात नाहीए. उलट दिवसेंदिवस मळभ पसरत चाललेय. उदासीनता गडद होत चाललेय. इतकी घनघोर की काही केल्या मन उभारी घेतचं नाही. मी थोरामोठ्यांची चरित्रे वाचतोय, तत्त्वज्ञान समजून घेतोय, इतिहासाची पानं मोडतोय, विज्ञान- तंत्रज्ञान अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतोय. स ध्याची परिस्थिती मला सर्वकाल, सर्वयुंगापेक्षा महाभयंकर वाटतेय. सगळं वाटोळं होतंय. आणि ज्या गतिने होतंय ती गती अनाकलनीय आहे. जगाला मिनिटा-मिनिटा

आली ही थंडी गुलाबी

Image
आली ही थंडी गुलाबी आज अचानक सकाळी मला लवकर जाग आली. जशी कधी तरी येते तशी. ऐरवी मी तीन-चार तास उशीरा उठतो. अलार्म वैगरे लावून मला झोपण्याची सवय नाही; त्यामुळे उठण्याचीही नाही. पूर्ण झोप काढून उठायचं. कुंभकर्णाने केली ती चूक आपण करायची नाही. अर्ध्या झोपेतून गेलेला म्हणून मारला गेला. पण त्याचं मरू दे! आज सकाळी मी लवकर उठलो. बायको रोजच्यासारखीच घट्ट बिलगून झोपलेली. पण इतर कुठच्या गोष्टीचा मूड झाला नाही म्हणून घराबाहेर पडलो. हिंडायला. अजून सगळीकडे अंधारच होता. कदाचित सूर्य त्याच्या बेडरूममध्ये असावा. चांदण्या आकाशात छान लुकलुकत होत्या. बहुतेक त्यांना सूर्याची गंमत माहित असावी किंवा ‘सूर्याला आज उशीरचं होणार’ हे त्यांच्या ध्यानी आलेलं असावं. पण खरोखर उशीर झाला असेल तर सूर्याने त्याचं टेन्शन घेवू नये. चांगले थंडीचे दिवस आहेत, साला आता मजा नाय करायची तर केव्हा करायची? चांदण्या म्हणतील पावसाळ्यात पण मजा करतोच की! तरी त्याला हक्क आहे. त्याची बायको मार्च मध्ये माहेरी जाते ती डायरेक्ट जूनमध्ये येते. इतके दिवस हा जी कळ काढतो ती काय थोडी? एकतर याच्या अंगात केवढी आग! असो! बाहेर पडल्यापासून