कल्लोळ


 ( रात्रीची वेळ. एक तरुण मुलगा बाहेरून घरात येतो. हातातील ओली छत्री न उघडता तशीच फेकून देतो आणि एका खुर्चीत रेलून बसतो. [तो थोडा भिजलेला आहे.] मग ओघळणारे थेंब हातानेच पुसतो आणि झटक्यात उठून काहीतरी शोधू लागतो. एक डायरी त्याच्या हाताला लागते, तिची पानं चाळतो आणि कुठून तरी पेन हुडकून लिहू लागतो. )
यंदाच्या वर्षातही ग्रेड घसरणार. गेल्या वर्षी निदान B तरी मिळाला होता. टी.वाय. तर बाहेरून दिलेलंच बरं. साला हे आयुष्यात मित्र घुसलेत की दुश्मन. नासाडी होतेय सगळी. आजचीच गोष्ट घ्या. बाहेर छान पाऊस पडत होता. अभ्यासात मन लागतच नाही हल्ली, म्हणून म्हटलं ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय वाचून त्यावर चिंतन-मनन करू. तेवढच मौलिक काहीतरी. तितक्यात आला धन्या.
चल बाहेर जाऊया.
मी नाय येणार.
पोरीसारखी नाटकं करू नको.
नाटकं कसली? मला खरोखर नाय यायचं तुझ्याबरोबर.
पिंकू असती नं तुला मस्का लावला नसता. भेंंच्योत बाप तिचा जबरदस्ती घेऊन गेला गावी. मरू दे, जावू दे. तू चल.
पण कुठे जायचंय?
पंचायती सोड आणि चल. बाहेर इतका मस्त पाऊस पडतोय अन् पोथ्या कसल्या वाचत बसलाय.
शेवट ज्ञानेश्वरी राहिली. या चांडाळा बरोबर मी भटकंतीवर. पाऊस छान पडत होता. निसर्ग अगदी हिरवागार झालेला. खूप बरं वाटत होतं मला. वैताग सगळा निघून गेलेला. मन चांगलं रमवून टाकलेलं पावसानं.
तितक्यात समोरून दोन मुली आल्या. छत्री नव्हती त्यांच्याकडे. त्यांना डोळे फाडून पाहिल्यावर महाशय सुरु. पावसाळ्यात दोनचं गोष्टी खूप छान दिसतात. आता विषय कुठे घसरणार हे कळून चूकल्यामुळे मी गप्पचं राहिलो. तरी हा पठ्या चालूचं. पावसाळ्यात दोनचं गोष्टी खूप छान दिसतात. भिजलेले रस्ते आणि भिजलेल्या पोरी. वाऱ्याने उडणारी ओढणी किंवा पदर हे तर निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. या भिकार लोकांच्या कल्पना आणि सौंदर्य नजरा ह्या असल्याचं.
नंतर पिंकू पुराण चालू.
सगळ्यात आधीच्या पावसाळ्यात पिंकू आणि हा एकाच छत्रीतून हिंडायचे फक्त.
दुसऱ्या पावसाळ्यात दोघं मस्तपैकी भिजून गरमागरम चहा घेवू लागले.
तिसऱ्या पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम भजी खावू लागले.
चौथ्या पावसाळ्यात चिकन सूप.
पाचव्या पावसाळ्यात पुन्हा चहा. फक्त आता जोडीला सिगरेट.
सहाव्या पावसाळ्यात सिगरेट सोबत रम.
आणि या सातव्या पावसाळ्यात असती तर हुक्का आणि चिलीम.
ही सात जन्माची बकवास कहाणी सांगून तो मोकळा झाला. या सहा पावसाळ्यात पिंकू दोनदा प्रेग्नंट राहिली. परंतु गोळ्या खाऊन सगळं छू. या सातव्या पावसाळ्यात कदाचित तिसऱ्यांदाही राहिली असती.
साला हा धन्या, निल्या, सम्या, पव्या हे सगळे टोळभैरव एकसारखेच. एकाला झाकावा अन दुसऱ्याला काढावा. के.टी. फॉर्म निघतात म्हणून साले आहेत कॉलेजमधे. यांच्या बरोबरच्या मुली पण तितक्याचं नालायक. ती प्रिया तर खूपच. एक तर साली मराठी असून हिंदी बोलते आणि जे बोलते ते नेहमी द्विअर्थी.
मागे कोणत्या तरी कागदावर सम्याला कॉलेजचा स्टॅम्प हवा होता. ही साली कागद माझ्या हातात देत म्हणते, “प्लीज ऑफिस मी जाके मरवाके आणा.” मागाहून म्हणते स्टॅम्प.
क्रिकेट मॅच होती तेव्हा पण, पायात घातलेले जुने पॅड खाली घसरत असल्यामुळे मी रणआउट झालो. पव्याला बोललो “पुढच्या मॅचला मला नवीन पॅड पाहिजेत”. ही मधेच येऊन “अरे टेन्शन मत ले, अग्ली बार मेरा लगा लेना.”
केवळ सात धावांनी माझी शंभरी राहिलेली पण प्रियाला तरी ठोकून काढावं असं त्याक्षणी मला वाटत होतं. म्हणजे लाथा-बुक्यांनी.
हे सगळे बेशरम आहेत. पण खुले. ढोंगीपणा नाही. मोकळेपणानं जगतात. जे आहे ते आहे. अभ्यासू, हुशार म्हणून मिरवणाऱ्यासारखे घमेंडखोर नाहीत. मित्राला देखील स्पर्धक म्हणून पाहणारे नीच नाहीत. आणि त्यांच्या सारखे सडू तर अजिबातच नाहीत. यांच्यासोबत दिवस अगदी हसत खेळत मस्त जातो. फक्त व्यर्थ जातो.
परंतु प्रश्न हा आहे, योग्य कोण? आयुष्याला खरा न्याय कोण देत आहे? यांच्यासारख होऊन सगळी नासाडीचं होईल हे कशावरून? मन नेहमी दोलायमान का असतं माझं. बाकीचे सिगारेट ओढतात तेव्हा मी नाही म्हणतो पण ती सिगारेट वारंवार खुणावत का राहते मला? आणि ती पिंकू स्वप्नात का येते माझ्या? शिवाय जेव्हा येते तेव्हा कपडे का नसतात तिचे? धन्याला कळलं तर खून करेल माझा. पण त्याआधी प्रियाला धडा शिकवला पाहिजे. खरोखर तिच्या सोबत काहीतरी घाण केलं पाहिजे. तिच्या डोक्यात नेहमी असतं त्यापेक्षा घाण. हे सालं पॉर्न बघणं बंद केलं पाहिजे. कसले कसले विचार येतात मनात. आपण चांगल वागायला हवं. सगळे आपल्याला खूप चांगले समजतात. सम्याची बहिण सुद्धा. पण ती साली टॉम बॉय वाटते. तिच्याशी एकदा संभोग केला पाहिजे. पण ती लेस्बो तर नसेल ना. शी... हे काय येत डोक्यात माझ्या. सम्याला एकदा दारू पिवून खूप शिव्या द्यायच्या, साल्याने माझे दीड हजार बुडवले. त्याच्या छोट्या बहिणीकडून वसूल करू. मैथिली पेक्षा ती छान दिसते. आत्ताशी नववीला आहे ती. असू देना काय झालं? का विकृत होत चाललोय मी असा. मन मंदिरासारखं पवित्र ठेवता आलं पाहिजे. मी भरत चाललोय पाप विचारांनी. सडत चाललोय. पण सुधारलं पाहिजे. यंदा कसाही करून A ग्रेड आणायचाचं. तरी एखादी सिगरेट ओढायला काय हरकत आहे. चांगल्या गोष्टींचा संग केला पाहिजे. हे विष बुद्धी भ्रष्ट करून टाकतयं. परमेश्वरा वाचव मला. चांगली सद्बुद्धी दे. ही दुर्बुद्धी जाळून टाक, भस्म करून टाक. आणि प्लीज वाचव मला. निल्या म्हणतो, “पोटात अतृप्त वासना असल्या की त्या उसळतात.” मग त्या शांत कशा करायच्या हे त्यालाही माहित नाही. आज ज्ञानेश्वरीचं वाचायला हवी होती. केवळ संभोग करायचा असेल तर स्मार्ट गर्लफ्रेंडचा शोध कशाला?  छे...,हे सगळं मी डायरीत काय लिहून ठेवतोय. मूर्ख झालोय का मी? (आणि पेन जोरात फेकून देऊन डायरीची पानं फाडू लागतो. मग काडीपेटी शोधून पेटती काडी त्या कागदांना आणि डायरीला लावतो. काही वेळानंतर त्या आगीकडे पाहत) ही आग विझली पाहिजे. ही आग विझवली पाहिजे. ही आग विझावायलाच हवी. (शेवटचं वाक्य जोराने ओरडत तो पेटत्या कागदांमधे हात घालतो.)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

मनोगाथा