कलाश्रेय


               
  घरी सहज वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. शेजारची मुलं चित्रकलेच्या वह्या घेऊन आपआपली चित्रे मला दाखवण्याकरिता आली. प्रत्येकाने आप-आपल्या परीने  बऱ्यापैकी चित्रे काढली होती. मला देखील चित्रकलेची अत्यंत आवड असल्यामुळे त्यातल्या काही मुलांच्या वहीवर मी दोन-चार चित्रे रेखाटली. ती त्यांना खूप आवडली. त्यांपैकी एकाने मला विचारले, ‘’दादा तुझ्यासारखी चित्र आम्हाला कधी जमतील?" त्यांना मी सांगितलं, "आपल्या हातांना एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा सहवास जास्त लाभला की उत्तम कला जन्म घेते. जसे, हातात पेन्सिल धरल्यास चित्रकला, पेन धरल्यास शिल्पकला, पेटी, तबला, बासरी धरल्यास वाद्यकला अशा अनेक."
त्यानंतर त्यांनी मी काढलेली आणखी चित्रे पाहण्यास मागितली व ती पहिल्यानंतर मला म्हणाले, "दादा तुझी चित्रे खूप छान आहेत!’’ मी म्हटलं, ‘’धन्यवाद; पण ही चित्रे मी काढली असली तरी माझी नाहीत. कारण माझ्या हातात कोणी तरी आधी पेन्सिल दिली, पेन्सिल धरलेल्या हाताला स्वतःच्या हातात धरून गिरवून घेतलं, कुणीतरी  रेघा, वर्तुळ, आकार आणि वळणं शिकवली, कुणीतरी ब्रश देऊन रंग भरायला शिकवले, चित्र सजवायला शिकवली, चित्र जिवंत करायला शिकवली. अशा खूप जणांनी ह्या हातात जादू भरली. म्हणून माझ्या हातांनी तयार होणारी चित्र केवळ माझी असूच शकत नाहीत; ती या सगळ्यांची आहेत!!’’



Comments

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ

मनोगाथा