Posts

Showing posts from August, 2017

कल्पनेचा पाऊस

Image
कल्पनेचा  पाऊस असं म्हणतात, साधारण गोष्टीला देखील आपल्या कल्पनेने, प्रतिभेने अलौकिक बनवतो, तो असतो कलाकार. या कलाकार मंडळीकडे एक वेगळी नजर आणि वेगळाच दृष्टीकोन असतो. कदाचित ही गोष्ट माझ्यात देखील आहे, असं मला वाटतं. कारण, अगदी लहानपणापासूनचं शाळेच्या खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस शाळेचं छत बाजूला करून आम्हावर पडावा किंवा त्याने नुसतंच शिक्षकांना भिजवावं, असं मला वाटायचं. काळ्या फळ्यावरील अक्षरे त्यावर पडलेल्या उन्हामुळे मलाचं सोनेरी दिसायची. खिडकीतून येणारं ऊन भिंतीच्या आधाराला दडून राहतंय आणि वारा मागोमाग त्याचा शोध घेण्यासाठी येतोय असं वाटायचं. बाकांच्या जागी आराम खुर्ची असावी, वह्या- पुस्तकांनी आपसूक बोलतं-लिहितं व्हावं, अशा भन्नाट कल्पनांनी डोकं भरलेलं असायचं.          आत्ता पण  आमच्या मुंबईतील उंची गगनचुंबी इमारत पाहताना, हीचा आधार घेऊन एखादा वेल वाढला तर? किंवा इमारतीच्या प्रत्येक गॅलरीतल्या कुंडीत वाढवलेल्या रोपट्यांनी एकत्र फुलं शिंपडली तर? अशा नाना कल्पना सुचतात. लोक उंच इमारत, प्रासाद पाहून बांधकामाचं कौतुक करतात. मी त्या इमारतीच्या कोनाड्यात केलेलं पक्

तेच ते तेच ते

Image
तेच ते तेच ते अस्सल माणसांच्या जगात वावरताना जगाला आलेला भंपकपणा कळतो. विद्यापीठं माणसं घडवतात का? पण माणसांनी विद्यापीठं घडवली. अंतर्बाह्य मनुष्य अभ्यासाचा एखादा कोर्स का नाही? प्रत्येक नोकरी धंद्याला उपयोगी पडणारा आहे हा कोर्स. प्रत्येक माणसाचा प्रवास एक वेगळ्याच तत्वावर चाललेला असतो. कारण त्याचं परीघ निराळं म्हणून त्याची गणितं पण निराळी. समाधानाची जागा तर त्याहून. म्हणूनच या गोलाकार जगात उभ्या, आडव्या, सरळ, तिरप्या, वर्तुळ अशा सगळ्या पद्धतीने चालणारी माणसं आढळतात. त्यामुळेचं समुहात सुद्धा प्रत्येक चेहरा निराळा राहतो. पक्षाची विचारसरणी मूर्ख. तरी पक्षासोबत राहून जनहिताची कामे घडवून आणणारा धाडसी. तो प्रचंड आशावादी असतो म्हणून त्याला वैफल्य नाही. आपल्यासारखे अनेक असतील फक्त गाठ पडण्याचा अवकाश आहे यावर त्याची श्रद्धा. कोणी नसलं तरी भगवंत नक्कीच असेल, या विश्वासावर त्याचा सगळा आशावाद. दुसरीकडे, हे मूर्ख जण कधीचं शहाणे होणार नाही या विश्वासावर ठाम. जग विनाशाकडे निघालय आणि विनाशकाले विपरीत बुद्धी हीच गोष्ट अगदी योग्य अशी त्याची समजूत. अथक परिश्रम केवळ तुम्हाला थकवा आणतात आण