बाबांसोबत पाहिलेले गणपती
बाबांसोबत पाहिलेले गणपती मागले दोन दिवस पिच्छा पुरवल्या नंतर आज कार्ट्याने टोकाचाचं हट्ट धरला. “बाबा मला गणपती बघायला घेऊन चल.” आता काय सांगू याला...? रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन इतकं थकून जात की कशाचाचं उत्साह राहत नाही. तसंही घराबाहेर पडून आवडीने साजरे करावेत असे सण राहिले नाहीत, का उत्सव राहिले नाहीत. पण बालपण म्हटलं की कुतूहल आलंच. लहानपणी मी सुद्धा माझ्या बाबांजवळ हट्ट धरला आणि अनेक गणपती पाहिले. त्यावेळचे गणेशोत्सव म्हणजे आनंद जल्लोष आजच्या इतकाचं, पण करमणूक आणि प्रबोधन त्याहून कित्येक पटीने जास्त. प्रत्येक छोट्या असो वा मोठ्या मंडपाबाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्या रांगेत लहानांपासून थोरांपर्यंत आणि श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्वच. निरनिराळी लोकं. धर्म,जात,पंथ विसरून आलेली. मग त्या रांगेत ओळख-पाळख, संवाद होऊन छान ऋणानुबंध जुळायचे. आम्हा लहान मुलांची तर फारचं गट्टी जमायची. मग आम्ही त्या रांगेचे उंदीर. कुठूनही घुस...